मुंबई : ज्ञानेश कुमारसारखा एक दरोडेखोर जो जनतेच्या मतांवर दरोडे टाकतो, भाजपला विजय करण्यासाठी हातभार लावतो त्याच्याविरुद्ध मोर्चा काय अजून बरंच काही व्हायला पाहिजेत, पण भूमिगतच आहेत, अमित शाह भूमिगत आहेत, सीमा खन्ना भूमिगत आहेत, मोदींची सुद्धा अखेरची घरघर सुरू आहे, त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील मोदींचा अखेरचा काळ सुरू आहे. मोदी जानेवारी ते फेब्रुवारी या काळापर्यंत या देशाच्या सत्तेत असतील की नाही याविषयी मी वारंवार आपल्याला सांगितलेल आहे. मोदी भविष्यात काही पुढील काळामध्ये सत्तेत राहणार नाहीत, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. फडणवीसांविषयी बोलताना राऊत म्हणाले की, ते सध्या केंद्रामध्ये सर्वोच्च पदावर जाण्यासाठी फक्त पाईपलाईनमध्ये आहेत आणि त्यांना त्या पाईपलाईनमधून बाहेर पडावे लागेल. त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.
राऊत यांनी सांगितले की, गर्जना मोर्चाला ज्या पद्धतीने मुंबईकरांनी महाराष्ट्राच्या जनतेने प्रतिसाद दिला ही देशाची भावना आहे. अखेरच्या काळामध्ये १९४२ साली ब्रिटिशांच सुद्धा संतुलन मानसिक अशा प्रकारे बिघडलं होतं तसच ह्या लोकांचा मेंदू झाला आहे. जसं मुंबईच्या रस्त्यांवर शक्ती प्रदर्शन झालं, तसंच दिल्लीच्या रस्त्यावर शक्ती प्रदर्शन होत आहे.
राऊत यांचा ओमराजेंवर सडकून प्रहार
राऊत म्हणाले, विद्यार्थ्यांच्या गर्दीतून उस्फूर्तपणे गद्दार गद्दार गद्दार ही लोकभावना आहे. ज्यांनी गद्दारी केली, बेईमानी केली त्यांना अशा प्रकारे जागोजाग अपमानित व्हाव लागत आहे. एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला ५- ५० कोटी रुपये दिले असतील पण तो तुम्हाला प्रतिष्ठा देऊ शकत नाही. तो तुम्हाला पोलिसांच्या दोन गाड्या देऊ शकतो मागे आणि पुढे, पण प्रतिष्ठा मानसन्मान हा तुम्ही गमावला आहे.
राऊत यांनी शिंदे यांच्यावर तोफ डागली
डेप्युटी सीएमला महाराष्ट्रात दुष्काळ आहे, महाराष्ट्रात लोक रस्त्यावर आहेत, ठिकठिकाणी भ्रष्टाचाराचा डोंगर वाढला आहे, लोक परेशान आहेत आणि हे दिल्लीमध्ये जाऊन गृहमंत्र्याच्या लॉनवर गवतावर बसतात, लाज वाटली पाहिजे, महाराष्ट्राची लाज काढताय तुम्ही. दुष्काळी तालुक्यांची फक्त यादी जाहीर करून तुम्ही दिल्लीला फिरताय हा निर्लज्यपणाचा कळस असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. राऊत म्हणाले की, शिंदे अमित शाहांच्या घरामध्ये ते पेईंग गेस्ट म्हणून राहतात, कारण त्यांना सतत त्यांना भेटायला जावं लागतं.